वार्ताहर/ उचगाव
कोनेवाडी व उचगाव ही दोन गावे नावाने जरी वेगळी असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम जवळपास एकच व मिळूनच आपण करत असतो. रेणुकादेवी मंदिर उचगावामध्ये असले तरी ते सर्वांचेच असून आम्हा कोनेवाडी ग्रामस्थांचा हातभार लागणे गरजेचे असल्याचे मत उचगाव ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष मोनाप्पा पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी कदम होते.
प्रारंभी रेणुका देवीचे पूजन माजी ग्रा. पं. सदस्य निंगाप्पा कंग्राळकर, लक्ष्मण किटवाडकर, मोनाप्पा पाटील, राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब देसाई, बाळकृष्ण तेरसे, ह.भ.प. मल्लाप्पा मेणसे, मधूकर जाधव, गोपाळ पावशे, लक्ष्मण पावशे, रामचंद्र डोणकरी, पुंडलीक पावशे, तात्या लोहार, शंकर पाटील, दत्ता चौगुले, लुमाण्णा पावशे, परशराम पावशे, कल्लाप्पा पाटील, चोपडे उपस्थित होते.
यावेळी कोनेवाडी ग्रामस्थांतर्फे रेणुकादेवी मंदिराला भरीव देणगी दिली. यावेळी जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी कदम यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचलन एन. ओ. चौगुले यांनी केले तर पुंडलीक पावशे यांनी आभार मानले.