ऑनलाईन टीम /मुंबई :
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
ते म्हणाले, सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील.
दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.