वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. आज रात्री ८ च्या सुमारास मयूर पेट्रोल पंप-भारती विद्यापीठ रोड जवळ हा अपघात झाला. आनंदा तातोबा शेंडे वय 40 राहणार खापरे माळ गोकुळ शिरगाव असे मृताचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी क्रमांक( एम एच-०९- इ सी-१३८०) दुचाकीचालक जाग्यावरच ठार झाला. त्याचा मृतदेह रस्त्यावर चित्रविचित्र स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उजळाई वाडी महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेला आहे.