कणकवली नगर पंचायतीने जाहीर केले दुकाने सुरू ठेवण्याचे नियोजन : मंगळवारचा आठवडा बाजार लॉकडाऊन संपेपर्यंत बंदच! : प्रत्येक दुकानदाराने नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करणार!
वार्ताहर
कणकवली
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी गर्दी रोखण्यासाठी व शासनाच्या आदेशानुसार दुकाने सुरू ठेवण्याबाबत न. पं.तर्फे नुकत्याच झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने ठरविण्यात आलेल्या वारांप्रमाणे, तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने मंगळवार वगळून सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारचा आठवडा बाजार लॉकडाऊन संपेपर्यंत पूर्णत: बंदच राहणार आहे. या दिवशीही औषध दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
कणकवली न. पं.च्या 17 प्रभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व्यक्तींच्या क्वारंटाईन कक्षाच्या व्यवस्थेचे कामकाज पाहण्यात येणार आहे. न. पं.मध्ये झालेल्या बैठकीला उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, प्र. मुख्याधिकारी आर. जे. पवार, समितीतील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ऍड. उमेश सावंत, न. पं.चे गटनेते संजय कामतेकर, सुशांत नाईक, नगरसेवक बंडू हर्णे, कन्हैया पारकर, मेघा गांगण, शिशीर परुळेकर, माही परुळेकर, उर्वी जाधव, ऍड. विराज भोसले, कविता राणे, बंडू गांगण आदी उपस्थित होते.
बैठकीत करण्यात आलेले दुकाने सुरू करण्याचे नियोजन असे : सोमवार, गुरुवार, शनिवार सुरू ठेवण्यात येणारी शहरातील दुकाने-पटकीदेवी मंदिर ते आप्पासाहेब पटवर्धन चौक ते कलमठ हद्दीपर्यंत (उत्तरेकडील दुकाने), हायवे कलमठ हद्दीपासून ते जानवली पूल ते करंबेळकर घरापासून विजयभवनपर्यंतच्या हायवेलगत असलेली दुकाने. झेंडा चौक ते तेलीआळीपासून छ. शिवाजी महाराज पुतळ्य़ापर्यंतची (पूर्वेकडील दुकाने), ढालकाठी रोड ते कणकवली कॉलेज, प्रांत ऑफीस रोड हायवेपर्यंतची (पूर्वेकडील दुकाने)s. गांगो मंदिर ते छात्रालय, टेंबवाडी रस्ता (दक्षिणेकडील दुकाने). जुने रेवडेकर हॉस्पिटल ते बाजारपेठ पाठीमागील भालचंद्रनगर. मच्छीमार्केटकडे जाणाऱया रस्त्यालगतची (दक्षिणेकडील दुकाने). छ. शिवाजी महाराजनगर रस्ता (पूर्वेकडील दुकाने), नवीन नरडवे रस्ता ते कणकवली हद्दीपर्यंत (दक्षिणेकडील दुकाने), पटकीदेवी ते नागवे रस्ता (पश्चिमेकडील दुकाने), नगरपंचायत, कंझ्युमर्स सोसायटी ते हर्णेआळी मार्गे डिपी रोडपासून हायवेपर्यंत (उत्तरेकडील दुकाने), नेहरुनगर ते मराठा मंडळ रस्ता (पूर्वेकडील दुकाने), उषा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग तेलीआळी ते सहय़ाद्री हॉटेलपर्यंतचा रस्ता (दक्षिणेकडील दुकाने.)
बुधवार, शुक्रवार व रविवार सुरू ठेवण्यात येणारी दुकाने-पटकीदेवी मंदिर ते आप्पासाहेब पटवर्धन चौक ते कलमठ हद्दीपर्यंत (दक्षिणेकडील दुकाने), गांगो मंदिर ते अनंत हॉटेल, गडनदी पुलापर्यंत, झेंडा चौक ते तेलीआळीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्य़ापर्यंतची (पश्चिमेकडील दुकाने), ढालकाठी रोड ते कणकवली कॉलेज, प्रांत ऑफिस रोड हायवेपर्यंतची (पश्चिमेकडील दुकाने. गांगो मंदिर ते छात्रालय, टेंबवाडी रस्ता (उत्तरेकडील दुकाने.) जुने रेवडेकर हॉस्पिटल ते बाजारपेठ पाठीमागील भालचंद्रनगर. मच्छीमार्केटकडे जाणाऱया रस्त्यालगतची (उत्तरेकडील दुकाने). छ. शिवाजी महाराजनगर रस्ता (पश्चिमेकडील दुकाने), नवीन नरडवे रस्ता ते कणकवली हद्दीपर्यंत (उत्तरेकडील दुकाने), पटकीदेवी ते नागवे रस्ता (पूर्वेकडील दुकाने), नगरपंचायत, कंझ्युमर्स सोसायटी ते हर्णेआळी मार्गे डिपी रोडपासून हायवेपर्यंत (दक्षिणेकडील दुकाने), नेहरूनगर ते मराठा मंडळ रस्ता (पश्चिमेकडील दुकाने), उषा कन्स्ट्रक्शन बिल्डिंग तेलीआळी ते सहय़ाद्री हॉटेलपर्यंतचा रस्ता (उत्तरे कडील दुकाने) सुरू ठेवता येणार आहेत.
शहरातील प्रत्येक दुकानदाराने कोविड 19 च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.