वार्ताहर / उञे
पन्हाळा पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कासारी नदीला महापूर आला आहे. पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात लाईट पोल व तारेवर लाकडे व कचरा अडकला आहे. यामुळे उञे गावाला पाणी पुरवठा करणारे पंप बंद झाले आहे. पुर ओसरल्यावर विद्यॄत पुरवठा होणार असल्याने नागरीकांना पाणी खंडीत होणार असल्याचे ग्रामपंचायतीने वतीने सांगण्यात आले आहे.
पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात सावधगिरी बाळगली असे आवाहन केले आहे.
तसेच पन्हाळा ते उञे पाणीपुरवठा योजना जॅकवेल पाण्यात बुडून येथील पाणीपुरवठा ही खंडीत होणार आहे. नदी काठीवरील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.वारा व पावसाने ऊस व इतर पिके भुईसपाट होऊन मोठ नुकसान झाले आहे.