उडुपी/प्रतिनिधी
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्रसरकारने गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घातले आहेत. यामध्ये देशातील मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत. देशातील महत्वाच्या मंदिरांमध्ये नेहमी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. पण कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे देशातील मंदिरे अद्यापही दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत. यामध्ये कर्नाटकातील उडुपीतील श्रीकृष्ण मंदिरात भाविकांना प्रवेश देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी मंदिर प्रशासनाने, कोरोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत भाविक त्यांच्या घरातून प्रार्थना करू शकतात असे म्हंटले आहे.
परंपरा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आता फक्त प्रतिशब्द मठातील प्रमुख मंदिरातील पूजा विधी नियमित सुरु राहील आणि ते या विधींमध्ये भाग घेतील. सर्व भाविकांनी जागतिक संकटाची परिस्थिती लक्षत घेऊन त्यांनी हे संकट टाळण्यासाठी घरीच पूजा अर्चा करावी असं म्हंटल आहे.