प्रतिनिधी/ बेळगाव
तिसरे रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून कोरोनानंतर कामाला गती आली आहे. सध्या ट्रॉझल बीमचे काम पूर्ण झाले असल्याने गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे फाटकापर्यंतच्या बीमवर गर्डर ठेवण्याचे काम पूर्ण झाल्याने यावर आता काँक्रीट घालण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तिसऱया रेल्वे फाटकावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ करून वर्ष झाले आहे. वर्षभरात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन उड्डाणपूल खुला होईल, असे सांगण्यात आले होते. पण ही केवळ घोषणाच ठरली. सदर पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखीन काही महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे.
पुलासाठी 14 पिलरची उभारणी करून ट्रॉझल बीम घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एकूण 14 पिलरवर 80 गर्डर घालण्यात येणार असून सध्या सर्व गर्डर तयार झाले आहेत. गर्डर ठेवण्याचे काम मागील दोन दिवसांपासून करण्यात आले आहे. याकरिता दोन पेन व टेलर मागविण्यात आले आहेत. रेल्वे फाटकापर्यंत गर्डर ठेवण्याचे काम शुक्रवारी पूर्ण झाले. रेल्वे फाटकाच्या दुसऱया बाजूचे गर्डर ठेवण्याचे काम शनिवारपासून करण्यात येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू केल्यानंतर लागलीच गर्डर बनविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. गर्डर निर्माण करण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने हे काम लवकर पूर्ण झाले. तसेच ट्रॉझल बिमवर ठेवण्यास अडचण भासत नाही.
काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी
गर्डरचे काम पूर्ण झाल्यानंतर पिलर उभारणीचे काम सुरू केले होते. पिलरच्या पायाची खोदाई करून काम सुरू केल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाला. परिणामी तीन महिने काम बंद ठेवले होते. अनलॉक झाल्यानंतर ट्रॉझल बिमचे काम पूर्ण झाल्याने गर्डर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. गर्डर ठेवण्यात आल्यानंतर स्लॅब घालण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे मार्गादरम्यान गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी रेल्वे खात्याकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. पण सध्या गर्डर ठेवण्याचे काम शनिवारपासून मार्गी लागण्याची शक्मयता आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्मयता आहे.