ऑनलाईन टीम / पुणे :
जगात शिक्षणाला डिग्री लागते, कलेला कोणतीही डिग्री लागत नाही. त्यामुळे उत्तम केलेला मरण नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुण्यात झील एज्युकेशन संस्थेच्या वतीने आज बालगंधर्व रंगमंदीरात ‘इंक आलाईव्ह’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित आदी उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, जगात शिक्षणाला डिग्री लागते. कलेला मात्र डिग्री लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम कला जोपासावी. शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये दडलेली कला ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला आत्मसात कराव्यात. पालकांनीही त्यासाठी आग्रही असणे आवश्यक आहे.