वेंगुर्ले/ वार्ताहर-
महाराणी ताराराणी हिच्या सारख्या महत्वाकांक्षी, ध्येयवादी, असामान्य कर्तृवाचा महामेरू रचणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यवीर व्यक्तींसाठी देण्यांत येणारा राष्ट्रीय पातळीवरील स्वराज्यरत्न राष्ट्रीय कृषिगौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कुंभारमाठचे आंबा बागायतदार उत्तम फोडेंकर यांना कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक नाटय़गृह सन्मापूर्वक प्रदान केला. परीवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी व एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन यांचेतर्फे छत्रपती शाहू स्मारक नाटय़गृह कोल्हापूर येथे आयोजित महाराणी ताराबाई भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनात महाराणी ताराराणी हिच्या सारख्या महत्वाकांक्षी, ध्येयवादी, असामान्य कर्तृवाचा महामेरू रचणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यवीर व्यक्तींचा दर तीन वर्षांनी महाराणी ताराराणी स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव अवॉर्ड महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचारमंच कोल्हापूर यांचेमार्फत देण्यात येतो. यात मालवण-कुंभारमाठचे उत्तम फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या राज्यात प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील स्वराज्यरत्न राष्ट्रीय कृषिगौरव पुरस्कार `स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका आणि `माझी तुम्ही रेशीमगाठ’ मालिकामधील अभिनेते आनंद काळे आणि राजे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिवकन्या अर्चना पारते यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक अनुदान मानधन समितीचे सदस्य बाळकृष्ण मोरे, कोल्हापूर राष्ट्रवादी सेलच अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी, महाराष्ट्र शासन चित्रपट निर्माता संदिप राक्षे, अहमदनगर जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मेमाणे, परीवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संचालक शिवकुमार मुरतले यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.