मडगाव
तोतया पोलिस, तोतया आरटीओ यांचा सुळसुळाट गोवेकरानी आजपर्यंत अनुभवला आहे. मात्र, आता तोतया मंत्री बनून गोव्याला लुटण्यासाठी देशातील सर्वात मोठे राज्य व भाजपची सत्ता असलेल्या योगी सरकारातील राज्याचे सहकारमंत्री असल्याचे भासवून संशयीत डॉ. सुनील सिंग, भाजपचे प्रदेश अध्यक्ष अजयकुमार यांनी निद्रिस्त गोवा शासनाचा शाही पाहुणचार घेतल्याचे आता उघडकीस आले आहे.
काही सहकारी संस्थाना गंडा घालून आठवडाभर गोव्याची सैर करणाऱया तोतया मंत्री व प्रदेश अध्यक्षाना गोव्यातून परतण्याच्या वेळी जरा विलंबाने रोखले असले तरी याच जागी एखाद्या अतिरेकी चमूने गोव्यात येऊन हाहाकार माजवला असता तर गोवा राज्य प्रशासनास ते अत्यंत नामुष्कीचे ठरले असते.
‘आवो जावो गोंय तुम्हारा’ या बिरूदावली प्रमाणे गोव्यात सर्व काही आलबेल आहे. ‘अतिथी देवो भव’ म्हणून दारी आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईसाठी गोवेकर कधीही मागे पुढे पाहत नाही व हिच मोख साधून पोलीस व गुप्तचर यंत्रणेला थांगपत्ता लागू न देता गोवाभर पाहुणचार घेण्यात दोघेही यशस्वी ठरले.
कार्यक्रमातून दिली बेधडक खोटी आश्वासने
केपे येथील आदर्श सहकारी कृषी संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या बक्षीस वितरण समारंभाला खोला पंचायत सभागृहात या दोन्ही महाभागांनी प्रमुख पाहुणेपदाची आसने स्वीकारून सहकार क्षेत्रातील संस्थांच्या विकासाला उत्तर प्रदेश सहकार खात्याकडून मार्च पुर्वी 10 कोटी रू व एप्रिल नंतर 5 कोटी अनुदान देणार असल्याचे आपल्या भाषणात घोषित करून उपस्थित सर्व शेतकरी व सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना आश्चर्याचा धक्का दिला होता. खोला परिसरात या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच या तोतया मंत्री महोदय व साथीदारांना अटक करण्यात आलेल्या वृत्ताने राजकीय नेते तोतयेगिरीतही पारंगत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कठोर शिक्षा करण्याची मागणी
खोला येथील ज्या सभागृहात त्या तोतया मंत्री महोदयांच्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे स्वीकारली त्यांना हा कार्यक्रम व समारंभाबद्दल तिटकारा येणे स्वाभाविक आहे. खोला येथील नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळाच्या जे÷ सभासदाकडून या संशयित मंत्री व साथीदारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही मामा बनविले…
यासंदर्भात आदर्श सहकारी कृषी संस्थेचे चेअरमन प्रकाश शंकर वेळीप यांच्याशी संपर्क साधला असता, माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सुचनेनुसार सदर तोतया बनून आलेल्या मंत्री महोदयानी गोवा बागायतदार, मार्केटिंग फेडरेशन, सहकार भांडार व गोव्यातील अग्रेसर सहकारी संस्थांना भेटी दिल्यामुळे त्यांना संस्थेच्या बक्षीस वितरण समारंभाला पाचारण केल्याचे स्प÷ केले. त्यांच्या शाही व विशेष पाहुणचारासाठी आपणांसही नाहक भूर्दंड पडल्याचे वेळीप यानी सांगितले.