ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखनऊच्या सीमेवर अलकायदा समर्थित दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिस महासंचालकांना मध्यप्रदेशात रेड अलर्ट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिश्रा म्हणाले, उत्तर प्रदेशात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यामुळे आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाची स्थिती लक्षात घेता आम्ही मध्यप्रदेशात रेड अलर्ट जाहीर केला आहे. मी पोलिस महासंचालकांना त्वरित या विषयावर रेड अलर्ट जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यात अल कायदाच्या संशयितांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशात अलकायदा समर्थित अन्सार गजावत उल हिंदच्या दोन दहशतवाद्यांना रविवारी लखनऊच्या सीमेवरून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी हे दहशतवादी कट रचत होते.