शबनमने प्रियकरासोबत मिळून कुटुंबाचा केला होता खात्मा
मथुरा
उत्तरप्रदेशच्या मथुरा कारागृहात महिलांनाही मृत्युदंड देण्याची व्यवस्था आहे. महिलांच्या फाशी घराच्या दुरुस्तीची तयारी केली जात आहे. तेथे शबनम नावाच्या महिला गुन्हेगाराला मृत्युदंड ठोठावला जाऊ शकतो. पण कारागृह अधीक्षकाने यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. महिलांना मृत्युदंड देण्यासाठी राज्यात हा एकमात्र कारागृह आहे. पण तेथे स्वातंत्र्यानंतर कुठल्याच महिलेला मृत्यूदंड देण्यात आलेला नाही. मथुरा कारागृहात 1870 मध्ये मृत्यूदंडाची व्यवस्था करण्यात आली होती. पण स्वातंत्र्यानंतर याचा वापर झालेला नाही. मथुरा कारागृहात पुन्हा एकदा जीर्ण झालेल्या फाशी घराच्या दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अमरोहाची रहिवासी असलेल्या शबनमला दिल्या जाणाऱया संभाव्य मृत्युदंडाची तयारी केली जात असल्याचे समजते. शबनमने प्रियकर सलीम सोबत मिळून 15 एप्रिल 2008 रोजी 7 जणांची हत्या केली होती. शबनमने स्वतःचे आईवडिल, दोन भाऊ, वहिनी, मावसबहिण, भाच्याचा कुऱहाडीने वार करत जीव घेतला होता.