ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज परिसरात झालेल्या SUV कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या भिवाडी गावातून एकाच कुटुंबातील 10 जण SUV कारमधून बिहारमधील भोजपूरच्या दिशेने निघाले होते. पहाटे पाचच्याच्या सुमारास कार उत्तरप्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असताना कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, कारचा टायर फुटून हा अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते.