लखनौ
उत्तरप्रदेश शिक्षक पात्रता परीक्षा (युपी-टीईटी) सर्व जिल्हय़ांमध्ये रविवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली, पण मथुऱयामध्ये व्हॉट्सऍपवर पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी उत्तरप्रदेश एसटीएफने 3 जणांना अटक करून चौकशी सुरू केली आहे. उत्तरप्रदेशच्या विविध ठिकाणी एसटीएफच्या 8 पथकांनी त्वरित कारवाई करत छापे टाकले आहेत. मेरठ, गाजियाबाद, नोएडा, आगरा आणि मथुऱयामध्ये विविध ठिकाणी कारवाई केली जात आहे. एसटीएफ याप्रकरणी लवकरच खुलासा करणार असल्याचे समजते. तर चालू महिन्यातच ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.