ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह पुन्हा एकदा क्वारंटाइन झाले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अभय रावत यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या आणखी एक ओएसडी गोपाल रावत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दून मधून एम्स ऋषिकेशमध्ये नेण्यात आले आहे. मुख्यमंत्री आज पासून तीन दिवस क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे आज होणारी राज्य मंत्री मंडळाची बैठक देखील स्थगित करण्यात आली आहे.