ऑनलाईन टीम / डेहराडून :
उत्तराखंडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज राजभवनात राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारताना नव्या मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीपर्यंत पदावर राहण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री रावत यांच्या कामाच्या पद्धतीबाबत भाजप आमदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळे रावत यांनीच नेतृत्त्वबदलाची भूमिका घेत राजीनाम्याचा निर्णय घेतला. नवे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे उच्च शिक्षणमंत्री धनसिंह रावत यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांना डेहराडूनला बोलावण्यात आले असूूून, उद्या (बुधवारी) सकाळी 10 वाजता पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार आहे.