ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत दिली.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाही आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतः ला आयसोलेट केले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः ची काळजी घ्यावी त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
राजभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांची नियमित तपासणी केली जात आहे. तसेच मागील काही दिवांपासून राजभवनात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्यांनी स्वतः ची टेस्ट करून घेतली होती. त्यामध्ये त्यांनी कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.