ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात रविवारी कोरोनाचे 32 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2800 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आढळलेल्या रुग्णांमध्ये नैनिताल 14, चंपावत 1, चमोलीमध्ये 2, देहरादूनमध्ये 10, रुद्रप्रयाग 1 आणि टिहरीमधील 4 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण रुग्णांपैकी 2018 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 749 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.