ऑनलाईन टीम / डेहराडून
उत्तराखंड येथे आज रविवार दि. ३१ आक्टोंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास प्रवासी वाहनाला भीषण अपघात झाला असुन यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार १३ जणांना प्राण गमवाले व दोघे जखमी आहेत. तर अपघात ग्रस्त गाडी ४०० मीटर खोल दरीत गाडी कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा अपघात बायला-पिंगुवा मार्गावरील गावापासून २०० मीटर अंतरावर घडला आहे. वाहनावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेले हे वाहन सुरक्षा भिंत तोडून थेट ४०० मीटर खोल दरीत कोसळले. अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली व बचाव कार्य सुरू झाले. दरम्यान, एसडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी पोहचली आणि बचाव कार्यास वेग आला. दरीत अनेक ठिकाणी मृतदेह पडलेले दिसत आहेत यामुळे बचाव कार्य ही गतीने सुरु आहे.