ऑनलाईन टीम / डेहराडून :
उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेलगत असणारा पूल अवजड सामुग्री घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे कोसळला. या दुर्घटनेत ट्रक चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक मिलम येथे चीनच्या सीमेशेजारी सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी साहित्य घेऊन जात होता. ट्रकमध्ये अत्यंत अवजड साहित्य असल्याने ट्रक पुलावरून जात असताना पूल कोसळला. त्यावेळी ट्रकमधील एक जण पुलावरून खाली पडला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत त्याला दवाखान्यात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.