ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये बुधवारी कोरोनाचे 23 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1560 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 23 रुग्णांमध्ये उधमसिंह नगरमध्ये 4 , देहरादून मध्ये 6, नैनितालमध्ये 6, पौडी आणि उत्तर काशिमध्ये प्रत्येकी एक – एक, टिहरी मध्ये 2 आणि हरिद्वार मधील 3 जणांचा सहभाग आहे.
तर आज एम्स ऋषिकेश मध्ये दाखल बिजनौर येथील एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना 7 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काशीपूरा येथे स्वतः च्या घरातच क्वारंटाइन झालेल्या 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला 2 जून पासून आपल्या पती सोबत होम क्वारंटाइन झाली होती.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 1560 रुग्णांपैकी 808 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.