देहराडून
उत्तराखंडमध्ये रविवारी रात्री 11.27 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भारताच्या राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रामध्ये झालेल्या नोंदीनुसार याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. राज्याच्या उत्तर काशीमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यापूर्वी रविवारी सकाळी उत्तर भारत 5 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाने हादरला होता. त्यामुळे रविवारी रात्री उत्तराखंडमध्ये झालेल्या धक्क्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.