ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 30 रुग्णांचा मृत्यू झाला तर 1003 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 3,31,478 वर पोहचली आहे.
तर कालच्या 2 हजार 778 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 93 हजार 768 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 31,688 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 216 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 44, हरिद्वारमध्ये 171, नैनिताल 119, उत्तरकाशीमध्ये 18, पौडीमध्ये 57, टिहरी 79, अल्मोडा 54, रुद्रप्रयाग 48, चमोली 58, चंपावत 4, पिथोरागडमध्येे 126 आणि बागेश्वर जिल्ह्यात 9 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 6,535 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 25,366 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.