- मागील 24 तासात 4,492 नवीन कोविड रुग्ण; 110 मृत्यू
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. प्रदेशात मागील 24 तासात 4 हजार 492 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 110 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 7 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 00 हजार 282 इतकी झाली आहे. यातील 2 लाख 16 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 32,269 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 874 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 341, हरिद्वारमध्ये 548, नैनिताल 621, उत्तरकाशीमध्ये 199, पौडीमध्ये 356, टिहरी 169, अल्मोडा 292, रुद्रप्रयाग 318, चमोली 363, चंपावत 243, पिथोरागडमध्येे 85 आणि बागेश्वर जिल्ह्यात 83 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 5325 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 73,172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.11 % तर मृत्यू होण्याचे प्रमाण 1.77 % इतके आहे.