ऑनलाईन टीम / बागेश्वर :
उत्तराखंडातील बागेश्वर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
दरम्यान, 1 डिसेंबर रोजी देखील उत्तराखंडातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. बहादराबाद ब्लॉकमधील औरंगाबाद भागातील डालूवाला काला गाव हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.