ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मंगळवारी कोरोनाचे 67 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1912 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 67 रुग्णांमध्ये अल्मोडा मध्ये 10, देहरादूनमध्ये 12, उत्तर काशिमध्ये 4, टिहरीमध्ये 14, हरिद्वारमध्ये 8, पिथौरागडमध्ये 7, ऊधमसिंह नगर मध्ये 8, पौडी आणि नैनितालमधील प्रत्येकी दोन जणांचा सहभाग आहे.
दरम्यान, उत्तराखंड राज्यातील एकूण 1912 रुग्णांपैकी 1194 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 680 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे ही पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.