ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात दिवसभरात 328 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 05 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 हजार 005 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 11,796 रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर नवीन आढळलेल्या 328 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 09, बागेश्र्वर 11, चमोली 07, चंपावत 12, देहरादून 130, हरिद्वार 29, नैनिताल 23, पौरी गरवाल 17, पिथोरगड 25, रुद्र प्रयाग 01, तेहरी गरवाल 19, यू एस नगरमधील 27 आणि उत्तर काशीमधील 18 जणांचा समावेश आहे.
- 60 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 505 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 60,429 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.55 टक्के इतके आहे. तर सध्या 03 हजार 955 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1080 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.