ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये सोमवार दुपार पर्यंत कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1380 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 25 रुग्णांमध्ये बागेश्वर, चंपावत आणि रुद्रप्रयोग मधील प्रत्येकी दोन, चमेली, देहरादून, नैनिताल व ऊधमसिंह नगर मध्ये प्रत्येकी एक, पौडीमध्ये चार, टिहरी मध्ये तीन आणि हरिद्वार मधील आठ जणांचा सहभाग आहे. तसेच हरिद्वार मध्ये आढळलेल्या एका रुग्णाला सोडून बाकी सर्व रुग्ण उत्तराखंडी आहेत.
दरम्यान, उत्तराखंड राज्यात आता पर्यंत 663 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.