ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. सोमवारी उत्तराखंडात 37 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3161 वर पोहचली आहे,अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आढळलेल्या 37 रुग्णांमध्ये ऊधमसिंह नगरमध्ये सर्वात जास्त 20, अल्मोडामधील 3, देहरादूनमध्ये 4, हरिद्वारमध्ये 5, नैनिताल 4 आणि पौंडी मधील एकाचा समावेश आहे. तर कालच्या दिवसात 62 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, उत्तराखंड राज्यात आतापर्यंत 2586 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 टक्के इतके आहे. तर सध्या 505 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.