ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 429 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 68,887 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 8, 145 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर देहरादून जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच 142 रुग्ण आढळून आले. तर रुद्रप्रयाग मध्ये 36, पिथौरागड 35, उत्तरकाशीमध्ये 31, पौंडी 23, अल्मोडा 22, ऊधमसिंह नगर 19, हरिद्वार 18, बागेश्वर 14, चमेली 17, टिहरी 12 आणि चंपावत 8 जणांचा समावेश आहे.
मंगळवारी 3 जणांचा मृत्यू झाला. तर 440 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 62 हजार 995 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 4,164रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.