ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढीच्या बाबतीत थोडी घट दिसून आली. मात्र, मृत्यू संख्या वाढली आहे. मागील 24 तासात 2,160 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 18 हजार पेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 26 हजार 193 इतकी झाली आहे.
दरम्यान, रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात केवळ 532 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी 28, 170 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 649 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 461, नैनिताल 322, उधमसिंह नगर 224, टिहरी 142, चमोली 22, पिथोरागडमध्येे 4, पौडीमध्ये 114, बागेश्वर 7 आणि चंपावतमध्ये 15 , अल्मोडा 79, रुद्रप्रयाग 32 आणि उत्तरकाशीमध्ये 89 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 18,864 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 1 लाख 02 हजार 899 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1892 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.54 % इतके आहे.