ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 464 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 05 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 86 हजार 317 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 13,722 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 464 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 22, बागेश्र्वर 04, चमोली 18, चंपावत 05, देहरादून 188, हरिद्वार 31 नैनिताल 73 पौरी गरवाल 17, पिथोरगड 42, रुद्र प्रयाग 16, तेहरी गरवाल 11, यू एस नगरमधील 19 आणि उत्तर काशीमधील 18 जणांचा समावेश आहे.
- 77,673 कोरोनामुक्त!
दिलासादायक बाब म्हणजे काल 347 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 77,673 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.99 टक्के इतके आहे. तर सध्या 6 हजार 177 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1, 413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.