ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 500 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 02 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 1 लाख 00 हजार 911 इतकी आहे. सद्य स्थितीत 2,236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 17,370 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 236 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 5, बागेश्वर 4, चमोली 1, चंपावत 1, हरिद्वार 149, नैनिताल 49, पौडी गडवाल 14, पिथौरागड 05, रुद्रप्रयाग 02, टिहरी 11, उधमसिंह नगर 22 आणि उत्तरकाशीमध्ये एका नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1719 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 125 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 95,495 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.