- 3000 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात 550 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 हजार पेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 02 हजार 264 इतकी झाली आहे.
दरम्यान, रुग्ण वाढीच्या मानाने रुग्ण कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. कालच्या दिवसात केवळ 148 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी 34,568 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 221 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हरिद्वारमध्ये 173, नैनिताल 55, उधमसिंह नगर 23, टिहरी 17, चमोली 2, पिथोरागडमध्येे 5, पौडीमध्ये 14, बागेश्वर आणि चंपावतमध्ये प्रत्येकी आठ – आठ, अल्मोडा 14, रुद्रप्रयाग 1 आणि उत्तरकाशीमध्ये 9 रुग्ण आढळून आले आहेत.
सद्य स्थितीत 3017 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 95,973 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1727 (1.69 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.85 % इतके आहे.