ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील आठवड्यापेक्षा आणखी कमी रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी 82 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 03 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 95,908 इतकी आहे. सद्य स्थितीत 1338 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 9040 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 44 नवे रुग्ण आढळून आले. बागेश्वर 01, चमोली 1, हरिद्वार 17, नैनिताल 11, उधमसिंह नगर 5 , पौडी गडवाल 03 तर पिथौरागड, चंपावत, रुद्रप्रयाग, टिहरी, अल्मोडा आणि उत्तरकाशीमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1642 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 178 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 91, 597 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.