- चार तारखेला त्रिवेंद्र सरकार सादर करणार अर्थसंकल्प
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारी प्रवक्ता मदन कौशिक यांनी सांगितले की, आगामी 1 ते 4 मार्च दरम्यान राजधानी गैरसैंणमध्ये उन्हाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे ते म्हणाले, चार मार्च रोजी त्रिवेंद्र सरकार प्रदेशाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. पुढे ते म्हणाले कुंभमेळ्याची नियमावली जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. आता लवकरच कुंभमेळ्याची एसओपी जारी केली जाणार आहे.
- मंत्रीपरिषदेतील अन्य निर्णय :
- स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या समित्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये आमदार, खासदार आणि मंत्री नामित सदस्य असणार आहेत.
- जल जीवन मिशन अंतर्गत 97 पदांना सहमती
- उत्तराखंड पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक सेवा नियमात बदल करण्यात आले.
- उत्तराखंड अग्निशमन सेवा, आपत्कालीन सेवा, अधिनस्थ अधिकारी कर्मचारी सेवा नियमात दोन दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. –