ऑनलाईन टीम / टिहरी :
उत्तराखंडमधील टिहरी भागात मंगळवारी सायंकाळी 6.18 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 एवढी आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. तसेच भूकंपाचे केंद्र कोणते होते ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, यापूर्वी 13 एप्रिल रोजी बागेश्वर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 3.6 इतकी होती. 10 एप्रिल रोजी देखील येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते त्याची तीव्रता 3.1 एवढी होती.