चोवीस तास वीजुपरवठा, 300 युनिट मोफत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंड राज्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. राज्यात ‘आप’ची सत्ता आल्यास 24 तास वीज पुरविण्याबरोबरच 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल आणि जुने वीज बिल माफ केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच 6 महिन्यांत 1 लाख सरकारी नोकऱया देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी उत्तराखंडसाठी जॉब पोर्टल तयार केले जाईल. त्यानुसार 6 महिन्यात 1 लाख सरकारी नोकऱया पुरविल्या जातील. तसेच नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारांना दरमहा 5,000 रुपये भत्ता दिला जाईल. याशिवाय रोजगार आणि स्थलांतर मंत्रालय देखील तयार केले जाईल. याद्वारे राज्यातील लोकांनाच रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ‘आप’ने घोषणापत्रात म्हटले आहे. केजरीवाल यांनी निवडणुक आश्वासनांमध्ये आरक्षणाचाही उल्लेख केला आहे. राज्याच्या नोकऱयांमध्ये 80 टक्के स्थानिकांना आरक्षण मिळेल. असे सांगत दोन दशकांपासून सत्ता गाजवणाऱया पक्षांनी राज्याची दुर्दशा केली आहे. डोंगर, जंगल आणि जमीन सर्वांची लूट केली आहे. आम्ही 21 वर्षांची ही दुर्दशा सुधारण्याच्या तयारीत आहोत, असे केजरीवाल म्हणाले.