ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील पिथोरागड आणि बागेश्वर जिल्ह्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. सोमवारी दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप पिथोरागड जिल्ह्यातील नाचणी भागात आणि बागेश्वरमध्ये जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टल स्केल एवढी होती. भूकंपाचेे केंद्र म्युनसारी सांगितले जात असून भूकंपाचे केंद्र जमिनीपासून दहा किलोमीटर खाली होते. यामध्ये प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
यापूर्वी या दोन्ही जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये देखील भूकंप झाला होता. भूकंपाची तीव्रता 4 रिश्टल स्केल एवढी होती. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता यापेक्षा अधिक म्हणजेच 3.7 रिश्टल स्केल एवढी आहे.