- 2 हजार पेक्षाअधिक जागांवर होणार शिक्षक भरती
ऑनलाईन टीम / देहरादून :
राज्य स्थापना दिवशी शिक्षक भरती केली जाणार असा आदेश मिळाल्याने प्रदेशातील बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण सचिवांकडून प्राथमिक सहाय्यक अध्यापकांची रिक्त पदे भरती करण्यात यावीत असे आदेश आले आहेत.
शिक्षण सचिवांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, शिक्षकांची भरती उत्तरखंड राजकीय प्राथमिक शिक्षा अध्यापक सेवा नियमावली 2019 च्या व्यवस्थेअंतर्गत केली जाणार आहे. भरती अर्ज दाखल करण्यासाठी शासनाकडून 20 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. शिक्षा सचिवांकडून सांगण्यात आले आहे की, सहाय्यक अध्यापक प्राथमिकच्या रिक्त जागांवर जिल्हा पदांच्या जाहिरातींची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. शिक्षक भरती उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निर्णयाआधीन असेल.
प्राथमिक शिक्षणचे अतिरिक्त संचालक बी एस रावत यांनी सांगितले की, शिक्षण भरतीसाठी जिल्हावार पदे काढली जातील. शासनाच्या आदेशानंतर सर्व जिल्ह्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.