ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात आज निधन झाले आहे. सुरेंद्र जीना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांनी आज अंतिम श्वास घेतला.
सुरेंद्र सिंह जीना हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट निर्वाचन क्षेत्रातील आमदार होते. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वीच हार्ट ॲटॅक आल्याने निधन झाले होते. सुरेंद्र जीना यांच्या निधनाने सर्वत्र दुःखाची लाट पसरली आहे. दिल्लीतून त्यांचे पार्थिव उत्तराखंडात आणले जात आहे.
सुरेंद्र जीना हे लोकप्रिय आमदार होते. सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.