ऑनलाईन टीम / ऋषिकेश :
उत्तराखंडात सोमवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. लक्ष्मणझूला – सिलोगी मार्गावर एक कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मणझूला – सिलोगी मार्गावर झालेल्या अपघात झालेल्या कारमध्ये चार लोक बसले होते. यामधील चालकासह आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे तर एका जखमी मुलीला पोलिसांनी दरीतून बाहेर काढत रुगणवाहिकेतून ऋषिकेश एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
स्टेशन पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह कठैत यांनी सांगितले की, सोमवारी देहरादून येथील बंजारावाला मधून चार जण बलूनी गाव ब्लॉक कलजीखाल पौडीला जाण्यासाठी निघाले. दुपारी साधारण पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नीलकंठ मार्गावर घट्टूघाड च्या पुढे बिजनी बडीमध्ये चालक ओम प्रकाश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दरीत कोसळली.
या अपघातातील मृतांची ओळख पटली असून चालक ओम प्रकाश, रामरखी आणि साक्षी अशी त्यांची नावे आहेत. तर अंजली या अपघातामध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांना ऋषिकेश मधील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या बचावदलामध्ये राजेंद्र सिंह कठैत यांच्यासह एस. आय जगविर सिंह, कॉन्स्टेबल प्रदीप सैनी, अनुराग पाल, राजेंद्र चौहान, पवन कुमार, अरविंद राजेंद्र आणि राजेश यांचा समावेश आहे.