ऑनलाईन टीम / ऋषिकेश :
उत्तरखंडामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवुड सिंगर जुबिन नौटियालचे वडील आणि माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष रामशरण नौटियाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कुटुंबातील अन्य सर्व सदस्य आयसोलेट झाले आहेत.
रामशरण नौटियाल यांनी स्वतः फेसबुक वर ही माहिती दिली. ते म्हणाले, माझ्यामध्ये कोरोना ची काही लक्षणे दिसून आल्याने मी कोरोना ची टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पुढे म्हणाले, सध्या माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी एम्स ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. पुढे ते म्हणाले माझ्या संपर्कात असलेले लोक, संपूर्ण परिवार आणि स्टाफमधील लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.