- सरकारने जारी केले आदेश
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील सरकारी व अनुदानित अशासकीय शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे नवीन शैक्षणिक सत्र 15 एप्रिल पासून सुरु होणार आहे. या बाबतचे आदेश शासनाकडून शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 14 एप्रिलपर्यंत गृह विभागाची परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
या संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. नुकतेच त्यांनी म्हटले होते की, सरकार उत्तराखंडातील खाजगी शाळांच्या वाढत्या आणि मनमानी फी वर बंदी आणणार आहे. त्यासाठी या शिक्षण सत्रापासून फी कायदा लागू करण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भात सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला जाईल.
दरम्यान, प्रदेश सरकारने इयत्ता सहावी ते बारावीच्या शाळा पहिल्यांदाच सुरू करण्यात आल्या असून या शाळांमध्ये ऑफलाईन अभ्यास सुरू आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आलेला आहे.