क्षेपणास्त्र आण्विक क्षमतेने युक्त असल्याचा अनुमान
वृत्तसंस्था / प्योंगयांग
उत्तर कोरियाने जगंग प्रांतात स्वतःकडून विकसित ह्यासोंग-8 हायपरसोनिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र आण्विक क्षमतेने युक्त असल्याचा कयास व्यक्त होतोय. हे क्षेपणास्त्र संरक्षण विज्ञान अकॅडमीने अलिकडेच विकसित केले आहे. उत्तर कोरियाने स्वतःच्या पूर्व किनाऱयावरून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्र डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या सैन्याने दिली आहे.
उत्तर कोरियाच्या शासकीय प्रसारमाध्यमाने या क्षेपणास्त्राला रणनीतिक अस्त्र संबोधिले आहे. तर या क्षेपणास्त्राच्या परीक्षणावेळी उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन उपस्थित नव्हते. हे क्षेपणास्त्र पंचवार्षिक सैन्य योजनेच्या नव्या शस्त्रास्त्र प्रणालीच्या अंतर्गत निर्माण 5 सर्वात विशेष शस्त्रास्त्रांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात आले.
महिन्यात तिसऱयांदा परीक्षण
उत्तर कोरिया निर्बंधानंतरही सातत्याने स्वतःच्या शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करत आहे. उत्तर कोरियाने चालू महिन्यात तिसऱयांदा क्षेपणास्त्र परीक्षण केले आहे. उत्तर कोरियाने स्ट्रेटिक क्रूज क्षेपणास्त्र आणि रेल्वेद्वारे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. मंगळवारी देखील उत्तर कोरियाने समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले हेते. अमेरिका उत्तर कोरियाबद्दल शत्रुत्वाची भावना बाळगून आहे. तसेच अमेरिकेने आमच्या विरोधात द्वेषपूर्ण धोरणाने लागू केली आहेत. याचमुळे आम्हाला परीक्षण करण्याचा अधिकार असल्याचे उत्तर कोरियाच्या प्रतिनिधींना संयुक्त राष्ट्रसंघाला सांगितले होते.
अमेरिकेची चर्चेची तयारी
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडे यांनी जानेवारीत पदभार स्वीकारल्यावर उत्तर कोरियाच्या धोरणांची समीक्षा केली होती. उत्तर कोरियासोबत कुठेही आणि कुठल्याही वेळी चर्चा करण्यास तयार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.