ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट नंतर आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने उत्तर प्रदेशात होणारी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी असा सल्ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. देशात ओमिक्रॉनचं वाढतं संकट लक्षात घेता उत्तर प्रदेश निवडणूक पुढे ढकलली जावी असा सल्ला अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाला विनंती करून निवडणूक पुढे ढकलावी असे म्हंटले आहे. तसंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज्यात प्रचारसभांवर बंदी घालण्याची आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने निवडणूक काही काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी विचार करण्याची विनंती केली आहे. याच्याशी संबंधित नसणाऱ्या एका जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने आपलं निरीक्षण नोंदवलं.
“जर सभावंर बंदी घातली नाही, तर दुसऱ्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम दिसू शकतात,” असं न्यायमूर्ती शेखर यादव यांनी यावेळी सांगितलं. तसंच आयुष्य असेल तरच जग आहे असंही म्हटलं.