ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत ५० महिलांना उमेदवारी दिली आहे. या महिलांमध्ये काँग्रेसकडून यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान त्या त्यांची लढाई लढू शकतील, त्यामुळे त्यांना तिकिट देण्यात आल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या. काँग्रेसनं उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी १२५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. १२५ उमेदवारांमध्ये ५० महिला उमेदवारांना काँग्रेसनं संधी दिली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील उमेदवांराची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आमच्या यादीत ज्या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यापैकी काही पत्रकार आहेत, काही संघर्ष करत असलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना खुप अत्याचार सहन करावे लागले अशा महिलांचाही समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. आम्हाला अत्याचार सहन करणाऱ्यांचा आवाज बनायचं असल्याचं सांगत उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी जाहीर केली. त्या आपल्या संघर्ष पुढेही सुरू ठेवतील, ज्यांच्या मुलीसोबत अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आलं, तिच सत्ता त्यांना मिळावी म्हणून त्यांना संधी दिल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.