ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये शनिवारी सकाळी 8 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये दोन सख्या भावांचा देखील समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे हरदोईमधील एकूण आकडा 178 इतका झाला आहे. यामध्ये 68 रुग्णांवर उपचार सुरू असून 108 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात शुक्रवारी एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच 800 पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. कालच्या दिवसात 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत 507 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे उत्तर परदेशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16,594 वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या गौतम बुद्ध नगरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 514 रुग्ण आहेत.
उत्तर प्रदेशात आतापर्यंत पहिल्यांदाच शुक्रवारी सर्वात जास्त म्हणजे 817 रुग्ण आढळले. याआधी एका दिवसात सगळ्यात जास्त आढळलेल्या रुग्णांची संख्या 630 होती.