ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात प्रदेशात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच 2250 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकूण 18 हजार 256 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रमुख आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.
ते म्हणाले, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 19,845 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत 1146 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर शनिवारी कॅबिनेट मंत्री कमल रानी वरुण व आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा यांच्यासह एकूण 1986 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तर राजधानी लखनऊ मध्ये रविवारी 224 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कॅबिनेट मंत्री कमल रानी वरुण यांनी त्यांना ताप आल्याने कोरोनाची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.