ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 480 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या 4451 वर पोहोचली आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, एकूण 12088 रुग्णांपैकी 7292 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले. कालच्या दिवसात कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू झाला. तर आता पर्यंत 345 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच कालच्या दिवसात उत्तर प्रदेशात 15 हजार 79 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. तर आता पर्यंत 4 लाख 11 हजार पेक्षा अधिक जणांच्या टेस्ट केल्या आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की, आशा वर्कर्सकडून आता पर्यंत 15 लाख 13 हजार 585 कामगार आणि श्रमिकांचा मागोवा घेण्यात आला आहे. तसेच आता पर्यंत 88 लाख 07 हजार 958 घरांवर लक्ष ठेवण्यात आले असून ज्यामध्ये 4 कोटी 48 लाख 429 लोक राहतात.